आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची मालेगाव बाह्य व मध्य विधान सभास्तरांवर मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत. बाह्य मतदारसंघात ३१७१ तर मध्यमध्ये २१३८ मतदार आहेत. ऑनलाइन नाव नाेंदणीसाठी १२ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या नावांचा पुरवणी यादीत समावेश केला जाणार आहे. सध्या शहरात आचारसंहितेची अंमलबजावणी केली जात आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घाेषित हाेवून आचारसंहिता लागू झाली आहे. मालेगाव बाह्य व मध्य मतदार संघातील पदवीधर मतदारांनी नाव नाेंदणी केली आहे. यानुसार बाह्यमध्ये ३,१७१ तर मध्यमधून २,१३८ मतदारांची नाेंदणी झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.