आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचाराचा धुराळा:पिंपळगावला 18 जागेसाठी 55 उमेदवार रिंगणात

पिंपळगाव बसवंत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ८० उमेदवारांनी माघार घेतली. सरपंच पदासाठी ४ तर १७ जागेसाठी ५१ उमेदवार रिंगणात राहिलेआहे. या निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याने उद्यापासून प्रचाराचा धुराळा उडणार आहे.

आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीकडून सरपंचपदासाठी गणेश बनकर, माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली दिव्य विकास पॅनलकडून भास्करराव बनकर, भाजपचे सतीश मोरे, बापूसाहेब पाटील व शिंदे गटाचे सुजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवा संघर्ष पॅनलकडून सतीश मोरे तर संतोष अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली क्रांती पॅनलकडून सीमा अहिरराव रिंगणात उतरले आहे.

बातम्या आणखी आहेत...