आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज गुरुवारी (दि.२) मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत असून तालुक्यात सर्व केंद्रांवर तयारी पूर्ण झाली आहे. सिन्नर तालुक्यात १५ केंद्रांवर दहावीच्या परीक्षा होत असून या परीक्षा केंद्रांवर एकूण ५ हजार ६२२ विद्यार्थी प्रविष्ट होत असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे यांनी दिली. २ मार्चपासून सुरु होणारी परीक्षा २५ मार्चला संपणार आहे. सिन्नर तालुक्यात दोन कस्टडी अंतर्गत १५ केंद्रांवर दहावीची परीक्षा होत आहे.
परीक्षेत गैरप्रकार घडू नयेत यासाठी पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्यात आली आहे. एका संस्थेतील शिक्षक दुसऱ्या संस्थेत पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहेत. सिन्नर तालुक्यात २३३ ब्लॉकसाठी एकूण २५१ पर्यवेक्षक आहेत. लोकनेते वाजे विद्यालय सिन्नर, जनता विद्यालय नायगाव, श्री ब्रह्मानंद स्वामी विद्यालय दोडी, भोर विद्यालय ठाणगाव, जनता विद्यालय डुबेरे, जनता विद्यालय पांढुर्ली, माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवाडे, जनता विद्यालय सोनंबे, एस. जी. पब्लिक स्कूल सिन्नर, चांडक कन्या विद्यालय सिन्नर, बारागाव पिंपरी विद्यालय, नूतन विद्यालय वावी, देवपूर माध्यमिक विद्यालय, नांदूरशिंगोटे विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल वडांगळी या १५ परीक्षा केंद्रांवर ५६२२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
वावी केंद्रावर तयारी पूर्ण
वावी येथील नूतन विद्यालयातील एस.एस.सी बोर्ड परीक्षा केंद्र क्रमांक १५७० मध्ये येथील व परिसरातील पाथरे , सायाळे, मीठसागरे, पांगरी, भोकणी, मऱ्हळ , एस. डी. जाधव शहा, आर. पी. गोडगे विद्यालया वावी इत्यादी विद्यालयातील एकूण ६२६ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट होणार असून त्यांची बैठक व्यवस्था २६ ब्लॉकमध्ये करण्यात आली आहे. बैठक क्रमांक : डी 084367 ते डी084992 दरम्यानचे विद्यार्थी सदर परीक्षा केंद्रात समाविष्ट आहे. सदर परीक्षेसाठी केंद्र संचालक दिलीप रानडे, सहायक केंद्र संचालक संजय शेलार, सुनील डुकरे, सहायक परिरक्षक राजेंद्र नागरे, प्रदीप लोहार, शरद ढाकणे आदींची नेमणूक केली आहे.
मनमाडला ४४५९ विद्यार्थी
मनमाड आणि नांदगाव मिळून तालुक्यांतील ४४५९ विद्यार्थी दहावी परिक्षेला सामोरे जातील. तसेच कॉपीमुक्त परिक्षा धोरण यावेळी राबविण्यात येणार आहे. नांदगाव आणि मनमाड शहरातील एकूण ११ केंद्रांवर या परिक्षा होणार आहेत. दहावीच्या परिक्षेसाठी मनमाड शहरांत सेंट झेवियर्स हायस्कूल हे मुख्य केंद्र असून छत्रे विद्यालय उपकेंद्र आहे. तसेच एचएके हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्येही विविध विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.