आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहनमंत्र्यांचा अल्टिमेटम झुगारला:मालेगावी 6 तर सिन्नरलाही 6 कर्मचारी हजर; मालेगाव आगारातील 260, सिन्नर 217 कर्मचारी संपावर ठाम

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एस. टी. कर्मचाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे अन्यथा त्यांना बडतर्फ करून त्यांच्या जागी नवीन कामगार भरती करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. मात्र, हा इशारा झुगारून लावत मालेगाव आगाराच्या २६० कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला आहे. कारवाईच्या धास्तीने केवळ सहा कर्मचारी कर्तव्यावर परतले आहे. सध्या १३२ कर्मचारी कामावर हजर असून दररोज विविध मार्गांवर ७३ बसफेऱ्या होत आहेत.

कर्मचाऱ्यांचा सरकारवर विश्वास नसल्याने की काय २६० कर्मचारी संपावर ठाम आहेत. येत्या ५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयीन निकालनंतरच पुढील भूमिका घेण्याची संपकरी कर्मचाऱ्यांची मानसिकता दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...