आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रमक भूमिका:तळवाडे व कंधाणे फीडरवरून दिवसा 6 तास वीज; शेतकऱ्यांचे उपाेेषण मागे

डांगसौंदाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीपंपाला नियमानुसार आठ तास वीजपुरवठा देणे बंधनकारक असताना तीन वर्षांपासून डांगसौंदाणेच्या तळवाडे, कंधाणे व निकवेल फीडरमधून रोज फक्त चार तास थ्री फेज वीजपुरवठा मिळत हाेता. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत हाेता. याबाबत वेळोवेळी निवेदने, आंदोलने व उपोषण करूनही मार्ग निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी डांगसौंदाणे उपकेंद्रासमोर बेमुदत उपाेषण सुरू केले हाेते.

त्याची दखल घेत महावितरणच्या सटाणा विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश बाेंडे यांनी उपाेषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेत शेतकऱ्यांना तळवाडे व कंधाणे फीडरमधून विभागून सहा-सहा तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी उपाेषण मागे घेतले. यासाठी आमदार दिलीप बाेरसे यांनीही मध्यस्थी करत शेतकऱ्यांची बाजू समजून घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना याेग्य त्या सूचना केल्या.

बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतीपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्याची दखल घेत कार्यकारी अभियंता बाेंडे यांनी उपाेेषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेत दाेघा फीडरवरून विभागून सहा-सहा तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, उपाेषणकर्ते नाराज हाेते. त्यानंतर दुपारी बागलाणचे आमदार बाेरसे यांनी उपाेषणकर्त्यांची भेट घेत त्यांची बाजू समजून घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी याेग्य वेळ वीजपुरवठा करण्याचे तसेच शेतकऱ्यांची मागणी असल्याने स्थानिक अभियंता दीपक साेनवणे यांची तत्काळ बदली करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी उपाेषण मागे घेतले.

उपोषणाला डांगसौंदाणेच्या सरपंच सिंधूबाई निकम, बाजार समिती संचालक संजय बिरारी व वसाकाचे माजी संचालक अमृता बिरारी, डांगसौंदाणे ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ बोरसे, रवींद्र सोनवणे, डॉ. सुधीर सोनवणे, कैलास केले, कडू सोनवणे, विजय सोनवणे, राजेंद्र सोनवणे, महेंद्र सोनवणे, साहेबराव बोरसे, रघुनाथ पवार, संतोष परदेशी, विजय बैरागी, उदय सोनवणे, मनोहर सोनवणे, अंबादास सोनवणे, प्रदीप सोनवणे, देवेंद्र सोनवणे, सुनील वाघआदींसह शेतकरी उपोषणाला बसल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. उपोषणस्थळी सटाणा पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.

आदिवासी भागातील वीज प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न
आगामी काळात निरपूर येथे पाच केव्हीचा वीज ट्रांसफार्मर बसविण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची भेट घेऊन आदिवासी भागातील या वीज उपकेंद्राची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार बाेरसे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...