आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदाच्या उन्हाळ्यात मात्र भाविकांना वातानुकुलित वातावरणात दर्शनरांगेत उभे राहणे सुसह्य हाेणार आहे कारण, बँक अाॅफ बडाेदाने देणगी म्हणून ६ माेठे टर्बाे कुलर दर्शनबारीत लावण्यासाठी दिले आहेत. अतिशय अाल्हाददायक वातावरणात भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेता येणार आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात त्र्यंबकेश्वरचे तापमान अतिशय सुखावणारे असते. त्यामुळे मंदीराच्या दर्शनबारीत भाविक सहजपणे दिड-दाेन तास उभे राहू शकतात.
मात्र उन्हाळ्यात तपमानामुळे ते त्रासदायक ठरत असते. बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक अजय खुराणा आणि मुख्य महाप्रबंधक जेठानंद चोपडा यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी मंदिर प्रांगणात कुलर लोकार्पणाचा कार्यक्रम झाला.
देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अॅड. पंकज भुतडा, तृप्ती धारणे आणि भुषण अडसरे यावेळेस उपस्थित होते. बँकेचे संचालक व महाप्रबंथक येथे दर्शनासाठी आले असता विश्वस्त अॅड. पंकज भुतडा यांच्याशी त्यांनी भाविकांच्या सेवेसाठी सीएसआर फंडामधून काय मदत करता येईल याची चर्चा केली. येणारा उन्हाळा मंदिर प्रांगणातील दर्शनबारीत उभे राहणाऱ्या भाविकांना सुसह्य व्हावा या हेतूने तातडीने कूलर देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात कार्यकारी संचालक अजय खुराणा यांनी भाविकांच्या सेवेसाठी यापुढे आणखी मदत करणार असल्याचे तसेच स्थानिक शाखेमार्फत मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळेस झालेल्या कार्यक्रमाचे नियोजन मंदिर प्रशासन अधिकारी समीर वैद्य, सुरक्षा अधिकारी विजय गंगापुत्र तसेच बँक ऑफ बडोदा नाशिक व त्र्यंबकेश्वर शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.