आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनदान:भालूर येथील 60 फूट खोल विहिरीत ;विहिरीत पडलेल्या लांडग्यास जीवनदान

मनमाड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असलेल्या भालूर येथील ६० फूट खोल विहिरीत पडलेल्या लांडग्याला ग्रामस्थ व वन विभागाने शर्थी प्रयत्न करून जीवनदान दिले. भालूर येथील चिंधा भिलारे हे सकाळच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या गट नंबर १४७ मधील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीत आवाज ऐकू आला. त्यांनी आत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत लांडगा पडला असल्याचे दिसून आले.

लांडग्यास बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण ते असफल झाले. त्यांनतर त्यांनी वन विभागाशी संपर्क केला असता मनमाड व नांदगाव वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मनमाडचे वनसंरक्षक सहायक डॉ. सुजित नेवसे आणि नांदगाव येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत कासार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मगन राठोड, वनरक्षक संजय बेडवाल, राजेंद्र दोंड, वनसेवक राजेंद्र महाजन, तुकाराम दाभाडे, जगदीश जाधव, कडुबा खोडके, शिवाजी ठाकरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत जाळी सोडली. मात्र, त्यांना यश येत नव्हते. अखेर टाकलेल्या जाळीत लांडगा अडकल्यामुळे त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अंदाजे पाच वर्षांचा नर असलेला हा लांडगा भक्षाच्या शोधात रात्री विहिरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...