आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा:२ वर्षांपासून ७० शेतकऱ्यांचे कांदा व्यापाऱ्याकडे ६० लाख थकीत

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इशारा : आठ दिवसांत पैसे न दिल्यास बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर उपोषण

तालुक्यातील ७० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी विकलेल्या कांद्यांचे ६० लाख रुपये बेलू येथील व्यापाऱ्याकडे थकीत आहे. वारंवार मागणी करूनही कांद्याचे पैसे मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समिती गाठत संताप व्यक्त केला. यावेळी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी शेतकऱ्यांची बैठक घेत बाजार समितीला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला. अन्यथा समितीच्या प्रवेशद्वारात शेतकरी उपोषण करतील, असा इशारा दिला आहे. याबाबत सचिव विजय विखेंना निवेदन देण्यात आले.

यावेळी दत्ता डोमाडे, जनार्दन सोनवणे, लक्ष्मीबाई घुगे, पोपट शिरसाठ, सोमनाथ उगले, तानाजी मापारी, प्रल्हाद गुरुळे, भागवत दुधाटे, नामदेव आव्हाड, विशाल शिरसाठ आदी शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...