आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणी:6236 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला; आज होणार मतमोजणी

सटाणा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बहुचर्चित सटाणा मर्चंट बँकेची निवडणूक शांततेत पार पडली. बँकेच्या ६२३६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ७४.७२ टक्के मतदान झाले. सोमवारी (दि.२०) रोजी सकाळी ८ वाजेपासून भाक्षी रोडवरील गुरुप्रसाद मंगल कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ होणार असून दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

येथील नामपूर रस्त्यावरील पंडीत धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये बँकेसाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान मतदान पार पडले. मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उत्साह दाखविला. या निवडणुकीत आदर्श व श्री सिद्धिविनायक पॅनलमध्ये सामना रंगला. मतदान केंद्रात पाच मतपत्रिकांमधून १७ उमेदवारांना मतदान करावचे होते. त्यामुळे प्रत्येक मतदाराला किमान मतदानासाठी पाच मिनीट लागत होते.

अपंग व वयोवृद्ध मतदार सभासद मतदानापासून वंचित न राहण्याची काळजी घेऊन त्यांना मतदान केंद्रापर्यंत व्हीलचेअरद्वारे नेण्यात आले. मतदानाची वेळ ४ वाजता संपल्यानंतर सभासदांनी मतदानासाठी गर्दी केली, परंतु वेळ संपल्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, सहायक पोलिस निरीक्षक किरण पाटील, वर्षा जाधव आदी अधिकारी लक्ष ठेवून होते. निवडणुकीचे कामकाज जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी सूजय पोटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शरद दराडे, सहायक निबंधक जितेंद्र शेळके, सहकार अधिकारी अनिल पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास बागडे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...