आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.१८) शांततेत मतदान झाले. सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्याने मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दाभाडीला ६६.९१ टक्के मतदान झाले. साैंदाणेच्या एका केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होताच बिघाड झाला होता. तातडीने नवीन मशीन बसवून मतदान सुरू केले.
माल्हनगाव, शिरसाेंडी, वजीरखेडे, दाभाडी, टाेकडे, राेंझे, जाटपाडे, साैंदाणे, निंबायती, पाटणे, करंजगव्हाण, माेहपाडे व चाैकटपाडे येथे मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या दाभाडीला सकाळपासून मतदारांच्या रांगा हाेत्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ११ तर टि. आर. हायस्कूलमध्ये ५ केंद्रांची व्यवस्था हाेती. थेट सरपंचपदासाठी पाच उमेदवार रिंगणात हाेते. सदस्य पदांच्या १७ जागांसाठी ५२ उमेदवारांनी नशीब आजमावले. तीन पॅनलमधील तिरंगी लढत झाली. दाभाडीला दुपारी चार वाजेपर्यंत ५३.३० टक्के मतदान झाले हाेते. निर्धारित वेळेत १५६०२ पैकी १०४५९ मतदारांनी मतदान केले. १३ ग्रामपंचायतींसाठी दुपारपर्यंत २७ हजार ६३७ मतदारांनी आपला हक्क बजावला हाेता. शिरसोंडीला १४३६ मतदान झाले.
गावनिहाय मतदानाची टक्केवारी माल्हनगाव - ८६.४८, शिरसाेंडी - ८५.६८, वजीरखेडे - ८२.०१, दाभाडी - ६६.९१, टाेकडे - ८२.८२, राेंझे - ६०.८२, जाटपाडे - ९२.४७, साैंदाणे - ६४.७३, निंबायती - ८६.३३, पाटणे - ७७.०१, करंजगव्हाण - ८२.५९, माेहपाडे - ९०.३२, चाैकटपाडे - ७८.६८.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.