आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन छेडण्याचा इशारा:उड्डाणपुलाच्या कामासाठी ७ दिवसांचा अल्टिमेटम ; काँग्रेसच्या आंदोलकांना लेखी आश्वासन

मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील उड्डाणपुलाचे अपूर्ण काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. १८) सकाळी नवीन बसस्थानकाजवळ धरणे आंदोलन छेडले. मनपाचे शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी आंदोलकांची भेट घेत चर्चा केली. सात दिवसांत काम सुरू करण्याच्या ठेकेदारास सूचना केल्या आहेत. काम सुरू न झाल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सादर हाेणार असल्याचे लेखी पत्र आंदाेलकांना देण्यात आले.

जुन्या आग्राराेडवर सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत स्वनिधीतून पुलाचे काम हाेत आहे. या कामास दाेन वर्षांची मुदत असताना पाच वर्षे उलटूनही पूल पूर्ण झालेला नाही. पुलाचे काम पूर्ण करावे अन्यथा आंदाेलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष एजाज बेग यांनी दिला हाेता. यासंदर्भातील निवेदन मनपा प्रशासनाला दिले हाेते. याची कुठलीही दखल घेतली न गेल्याने बेग यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदाेलन छेडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...