आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढ्या ठिकाणी चोरी:एकाच रात्री 7 दुकाने फाेडली

लासलगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कोटमगावरोड, स्टेशनरोड व ग्रामपंचायतीजवळील सुमारे सात दुकानांचे शटर वाकवत चोरट्यांनी धाडसी चोरी करून एकप्रकारे लासलगाव पोलिसांसमोर आव्हानच उभे केले आहे. शुक्रवारी (दि. १८) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पहिल्यांदाच एकाच रात्री एवढ्या ठिकाणी चोरी झाल्याने व्यापारी धास्तावले असून पोलिस यंत्रणादेखील चक्रावून गेली केली आहे. लासलगाव दौऱ्यावर आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील चोरी झालेल्या दुकानांची पाहणी केली.

कोटमगावरोड येथील विनिता गिफ्ट हाउस, नीलेश ट्रेडर्स, स्टेशनरोडवरील सद्गुरू ट्रेडर्स, राल्को टायर्स, सुमित ट्रेडर्स, सिद्धार्थ जनरल स्टोअर्स व एक मेडिकल अशा सुमारे सात ठिकाणी रात्री दीड वाजेच्या सुमारास दोघा चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवत आत प्रवेश करत सुमारे ४० ते ४५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. या दोघा चोरट्यांनी लासलगावात प्रवेश केल्यानंतर दुचाकी चोरल्याचे समोर आले असून याच दुचाकीच्या आधारे सर्व दुकान फोडण्यात आली आहे. सीसीटीव्हीमध्ये दोघे चोरटे कैद झाले असून सराईत गुन्हेगारासारखे केवळ दहा ते पंधरा सेकंदात त्यांनी शटर तोडून आतमध्ये प्रवेश केल्याचे यामध्ये स्पष्ट होत आहे. चोरीची माहिती मिळताच लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे, पोलिस कर्मचारी प्रदीप आजगे, योगेश शिंदे, कैलास महाजन यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून नाशिक येथील ठसेतज्ज्ञ यांना पाचारण केले. यासंदर्भात लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...