आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापन दिन:एस.टी.चा ७४ वा वर्धापन दिन ; मनमाड आगारात प्रवाशांना पेढे वाटप

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एस.टी.चा ७४ वा वर्धापन दिन मनमाड आगारात प्रवाशांना पेढे वाटप करून साजरा करण्यात आला. १ जून रोजी एस.टी.ने ७४ वर्षे पूर्ण केली. लालपरीचे महोत्सवी वर्षात पदार्पण असा फलक लावण्यात आला. आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.

बसस्थानक आकर्षक पताकांनी सजवण्यात आले. तसेच बसस्थानकात आलेल्या प्रवाशांचे स्वागत करून त्यांना पेढे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रातील कर्मचारी व प्रवाशांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी आगाराचे प्रमुख प्रीतम लाडवंजारी, विजय शेळके, दीपक सांगळे, दीपक कदम, रवींद्र आरोटे, अनिल सानप, धनंजय पाटील, गणेश पवार, माया पाटील, वनिता दराडे, छाया मोरे, शिवाजी काळे, एस.टी. वाहनचालक, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...