आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या पाच ग्रामपंचायतींसाठी ७८.७९ टक्के मतदान झाले. फुलेनगर, क्रांतीनगर, गिरणानगर, मल्हारवाडी, हिंगणवाडी या पाच ग्रामपंचायतींच्या ५९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
सकाळी ७:३० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ४६९१ मतदारांपैकी ३६९६ मतदारांनी हक्क बजावला. हिंगणवाडी येथील बूथ क्रमांक तीनवर सर्वाधिक ९०.८७ टक्के मतदान झाले. २६३ पैकी २३९ मतदारांनी मतदान केले. सर्वात कमी मतदान गिरणानागर येथील बूथ क्रमांक तीनवर ४१.९८ टक्के मतदान झाले. येथील ४७४ मतदारांपैकी १९९ मतदारांनी मतदान केले. किरकोळ शाब्दिक चकमकी वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. शुक्रवारी (दि. ५) सकाळी दहा वाजता येथील प्रशासकीय संकुलात मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी चार टेबलची व्यवस्था आहे. ५ फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण होईल. मतमोजणीसाठी ८ अधिकाऱ्यांची नियुक्ती आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.