आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरार:गोवंश जातीच्या 8 जनावरांची सुटका, संशयित फरार; पाच लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

बोरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुरगाणा तालुक्यातील करंजूल (क) येथे रविवारी (दि. १) रात्री अवैधपणे गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या दोन गाड्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे ताब्यात घेण्यात आल्या असून त्यातील सहा गायी व दोन गोऱ्हे अशा सहा गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, करंजुल परिसरातून दोन पिकअप (एमएच ३९ सी ७२७१) व (एमएच ११ एजी ३६००) मध्ये लहान मोठ्या अशा सहा गायी व दोन गोऱ्ह्यांची अवैधपणे वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती. जागृत ग्रामस्थांनी ही वाहने पकडून सुरगाणा पोलिस ठाण्यात जमा केली. मात्र, चालक फरार होण्यात यशस्वी झाले. या दोन पिक अप गाड्यांच्या मागे असणारी कार (एमएच ४८ टी ४०००) ही उलटली असून चालक अंधाराचा फायदा घेऊन जंगलाच्या दिशेने पसार झाला आहे.

याकामी वसंत बागूल, रामजी गावित, प्रकाश गावित, भास्कर जाधव, राहुल गावित, गणेश गावित, चंद्रकांत वाघेरे, परशराम गावित, अविनाश कोटील, अशोक धुम, शंकर राठोड, जगन पवार, चिंतामण गवळी, नारायण पवार, गिरीश गायकवाड, शिवराम गावित, श्रीराम कुवर, मनोहर भोये यांनी मदत केली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक इंद्रजित बर्डे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...