आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:8 महिला वेट लिफ्टिंग खेळाडूंचे यश; राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत मनमाडच्या खेळांडूना पदक

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोदीनगर (उत्तर प्रदेश) येथे २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या दुसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय महिला रँकिंग वेटलिफ्टिंग स्पर्धेत येथील जय भवानी व्यायामशाळेच्या आठ खेळाडूंनी सहभागी होत चमकदार कामगिरी बजावलीआकांक्षा किशोर व्यवहारे हिने ४० किलो युथ वजनी गटात तीन नवीन राष्ट्रीय विक्रम स्थापित करीत सुवर्णपदक व रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. युथ मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान लागोपाठ दुसऱ्यांदा प्राप्त केला. ५५ किलो वजनी गटात नूतन बाबासाहेब दराडे हिने पहिल्याच राष्ट्रीय वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली.

५९ किलो वजनी गटात ज्युनियरमध्ये वैष्णवी वाल्मीक इप्पर हिने पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत सहावा क्रमांक व रोख तीन हजार रुपये तर ६४ किलो वजनी गटात ज्युनियरमध्ये वैष्णवी जनार्दन उगले हिने राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली. ७१ किलो वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत निकिता वाल्मीक काळे हिने चांगली कामगिरी केली. ७१ किलो युथ व ज्युनियरमध्ये संध्या भास्कर सरोदे हिने चाैथा क्रमांक व ज्युनियरमध्ये सहावा क्रमांक मिळविला. ७६ किलो ज्युनियरमध्ये धनश्री विनोद बेदाडे हिने पाचवा क्रमांक, ७६ किलो युथमध्ये करिष्मा रफिक शाह हिने चाैथा क्रमांक पटकावला. आकांक्षाला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले.

जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे पी.जी. धारवाडकर, अध्यक्ष पी.जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर.एन. थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, एस. एस. पोतदार, गुरुगोविंद सिंग हायस्कूलचे अध्यक्ष बाबा रणजित सिंघ व प्राचार्य सदाशिव सुतार, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर, प्रमोद चोळकर, भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...