आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:चांदवडला 820 कर्मचारी सहभागी‎

चांदवड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचायत समिती‎ कार्यालयासमोर मंगळवारी (दि.‎ १४) राज्य सरकारी व निमसरकारी‎ कर्मचाऱ्यांनी निदर्शने व ठिय्या‎ आंदोलन केले.‎ या संपात तालुक्यातील सरकारी,‎ निमसरकारी कर्मचारी, आरोग्य,‎ महसूल, जिल्हा परिषद, पंचायत‎ समिती कर्मचारी, कनिष्ठ‎ महाविद्यालयीन, माध्यमिक शिक्षक‎ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन येथील‎ पंचायत समितीत एकत्र येत धरणे‎ आंदोलन केले.

१ नोव्हेंबर २००५‎ नंतर जुनी पेन्शन नाकारल्याने जुनी‎ पेन्शन लागू करावी या मागणीसाठी‎ अनेक वर्षांपासून आंदोलन केले‎ जात आहे. याबाबत अर्थसंकल्पात‎ कुठलीही तरतूद न केल्याने असंतोष‎ वाढल्याचे संपातील सहभागी‎ कर्मचाऱ्यांनी सांगितले. या संपात‎ तालुक्यातील ८२० कर्मचाऱ्यांनी‎ सहभाग घेतल्याची माहिती‎ संघटनेचे अध्यक्ष किरण गांगुर्डे यांनी‎ दिली.‎

बातम्या आणखी आहेत...