आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:नांदगाव तालुक्यात 86.82 टक्के मतदान

नांदगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ४० मतदान केंद्रांवर सकाळी ७:३० ते ५:३० वाजेपर्यंत ८६.८२ टक्के मतदान झाले. १५३२० पैकी ८१८० पुरुष व ७१४० महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

नवसारी, शास्त्रीनगर, कसाबखेडा या तीन या ग्रामपंचायतीची सरपंच निवड अविरोध झाली आहे तर १२ ग्रामपंचायतींसाठी ३३ उमेदवार रिंगणात हाेते. ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी उमेदवार १७५ रिंगणात हाेते.

गावनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी : नागापूर - ९१.०९, हिसवळ बुद्रुक -७७.६२, पिंपरखेड- ८२.८४, मुळडोगरी- ९८.९९, लक्ष्मीनगर - ८९.९६, हिरेनगर- ८९.८७, नवसारी - ८९.२६, धोटाणे खुर्द - ९४.१०, बोयगाव- ९३.३७, धनेर- ९३.१३, भार्डी - ९५.७४, कसाबखेडा - ८८.५८, लोढरे- ८२.३९, तळवाडे - ७८.३५

बातम्या आणखी आहेत...