आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत धुळे मतदारसंघात प्रस्तावित १०५ किलोमीटर लांबीच्या रस्ता कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी ८० कोटी ५१ लाख रुपये एवढ्या निधीच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. यापैकी मालेगाव तालुक्यातील दोन कामांकरिता नऊ कोटी ३९ लाख रुपये तर बागलाण तालुक्यातील पाच रस्ता कामांसाठी २३ कोटी ७५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
धुळे लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात रस्त्यांची कामे उत्कृष्ट पद्धतीने होण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत धुळे लोकसभा मतदार संघातील धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव व बागलाण तालुक्यातील काही प्रमुख रस्त्यांच्या समावेश प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात आला. यात धुळे ग्रामीण भागातील पाच रस्त्यांसाठी २४ कोटी ५४ लाख रुपये तर शिंदखेडा ग्रामीण भागातील तीन रस्त्यांकरिता २४ कोटी २३ लाख निधीला मान्यता देण्यात आली अाहे. तर मालेगाव तालुक्यात दोन रस्ता कामे मंजूर करण्यात आले आहेत. यात मालेगाव-मथुरापाडे ते निमगाव रोड ७.५०० किमीसाठी ५ कोटी ९७ लाख रुपये व दाभाडी साखर कारखाना ते भायगाव या ४.७०० किमीसाठी ३ कोटी ४२ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. लवकरच कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार डॉ. भामरे यांनी दिली.
बागलाणसाठी पाच रस्ते
बागलाण तालुक्यातील बंधारपाडे,वनोली, चौधाने फाटा या ३.८४० किमीरस्ता कामासाठी २ कोटी ९९ लाख रुपयेनिधी. नामपूर, फोफीर, गोराने,आसखेडा या ८.७५० किमी रस्तासुधारणा करण्यासाठी ६ कोटी ३० लाख, सोमपूर, दरेगाव, कातरवेल या ७.९२० किमी कामासाठी ६ कोटी राज्यमार्ग १९ चौंधाणे फाटा, जोरण, मोरकुरे, पठावे दिगर या ६.१३० किमी रस्ता कामासाठी ४ कोटी ३६ लाख, एकलहरेराेड , जायखेडा, लाडूद ४ किमी रस्ता कामासाठी ३ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे तालुक्यातील दळणवळण सुलभ होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.