आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण:दुचाकीवरील 9 वर्षाच्या बालिकेवर बिबट्याचा हल्ला

नाशिकरोड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथे ९ वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केला. बाप-लेकीने आरडाओरड केल्याने सुदैवाने मुलीच्या पायावर संकट निभावले गेले. मात्र, या प्रकाराने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.याबाबत सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा जाधव यांनी सांगितले की, सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील गौरी रांजेद्र लहाणे (वय ९) ही तिच्या वडीलांसोबत सांयकाळी सातच्या सुमारास सोनगिरी येथून नायगावला दुचाकीने जात हाेते.

यावेळी पाटाजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये गौरीचा उजवा पाय बिबट्याच्या जबड्यात आल्याने ती जखमी झाली आहे. दोघांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. सोनगिरी आणि नायगाव परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी पिंजरा लावुन बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...