आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगणात:येवल्यात सरपंचांसह सदस्य पदासाठी 90 उमेदवार रिंगणात

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोटमगाव बुद्रुक, एरंडगाव खुर्द, नांदेसर, आडगाव चोथवा, नायगव्हाण, कुसूर, चांदगाव या सात ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी १९ मतदान केंद्र करण्यात आले असून मतदान प्रक्रियेसाठी १३० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान साहित्यासह अधिकारी, कर्मचारी यांना स्कूल बस, शासकीय वाहनाने मतदान केंद्रावर पोहाेचविण्यात आले आहे. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच ही मतदान वेळ आहे.

अविरोध निवड झाली आहे. तर सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ६ सरपंच जागांसाठी १४ तर उर्वरित सदस्यांच्या निवडीसाठी ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सात ग्रामपंचायतपैकी कुसुर सरपंच निवडणूक वगळता बाकीच्या सहा ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत आहे. कोटमगाव बुद्रुक, एरंडगाव खुर्द, नांदेसर, आडगाव चोथवा व नायगव्हाण येथे सरळ लढत होत असून चांदगाव येथे तिरंगी सामना होत आहे.

बातम्या आणखी आहेत...