आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात देवळा आघाडीवर:बारा ते चौदा वयोगटांतील 90 टक्के मुलांचे लसीकरण, लसीकरण करून घेण्याचे आवाहन

देवळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात कोरोना प्रतिबंधक विशेष लसीकरण मोहिमेसह बारा ते चौदा वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण वेगात सुरू आहे. विशेष म्हणजे देवळा तालुक्याने यात आघाडी घेत १२ ते १४ वयोगटातील लाभार्थींचे ९० टक्क्यांच्या वर लसीकरण करत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. १५ वर्षांपुढील व्यक्तींनाही पहिला डोस ९४ तर दुसरा डोस ८२ टक्क्यांपेक्षा अधिक लाभार्थींना दिला गेला आहे. लसीकरण पथक प्रत्येक गाव-वाडी-वस्तीपर्यंत पोहोचत असून त्यांच्या माध्यमातून तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी केले.

तालुक्यातील सर्व शाळा-विद्यालयांमध्ये १२-१४ वयोगटातील लसीकरण सुरू आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना लसीकरण मोहीम वेगात सुरू असली तरी अद्यापही ग्रामीण भागातील काही मंडळी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यास अनुत्सुकता दर्शवत आहे. ही चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी हतबल झाले आहेत. जवळपास ८९० ज्येष्ठ लाभार्थींचे लसीकरण अद्याप शिल्लक आहे. अशा लाभार्थींची थेट भेट घेत कोरोनाची लस घेण्यास सांगितले, तरी त्यांची नकार घंटा कायम आहे.

गुंजाळवाडी येथील एकाच कुटुंबातील आठ जण कोरोना लसीकरणाचे लाभार्थी असतानाही ते टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करत त्यांचे प्रबाेधन करण्यात आले. यातील अडचणींची प्रचिती दाखवून दिल्याने याबाबत अजूनही जनजागृतीची गरज असल्याचे दिसून आले. आरोग्य यंत्रणा सुटीच्या दिवशीही लसीकरण करण्यासाठी कार्यरत असताना काही मात्र त्यातील गांभीर्य घेत नसल्याने अशांचे लसीकरण कसे करावे असा प्रश्न आरोग्य यंत्रणेपुढे आहे.

लसीकरणासाठी रात्रीचा दिवस
आमचे सर्वच कर्मचारी लसीकरण करून घेण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. समाजातील काही घटक नकार देत अरेरावी करतात. यामुळे काम करणे अवघड होऊन जाते. याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याची गरज आहे.
- डॉ. सुधीर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी

बातम्या आणखी आहेत...