आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:येवला तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी 90% मतदान

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी सरासरी ९० टक्के मतदान झाले. गावोगावी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. प्रतिष्ठेच्या लढती होत असल्याने दोन्ही बाजुंनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले गेले.

कुसूर येथे एकाच वाॅर्डासाठी मतदान घेण्यात आले होते. या वार्डात एकूण ५०४ मतदारांपैकी ४३६ मतदान झाले असून येथे ८६.५१ टक्के मतदान झाले. चांदगाव येथील तिन्ही वाॅर्डांसाठी मतदान झाले असून ९३७ मतदारांपैकी ८३८ मतदारांनी आपला हक्क बजावल्याने ८९.४३ टक्के मतदान झाले. एरंडगाव बुद्रुक येथे ७७२ पैकी ७२३ मतदारांनी हक्क बजावल्याने ९३.६५ टक्के मतदान झाले.

नांदेसर येथे ६६८ मतदारांपैकी ६१७ इतके मतदान झाले, येथे ९२.३७ टक्के मतदान झाले. आडगाव चोथवा ही लक्षवेधी ग्रामपंचायत ठरली असून येथील एकूण १५२५ पैकी १३८६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला येथील टक्केवारी ९०.८९ इतकी राहिली. यानंतर कोटमगाव बुद्रुक येथे ८३० मतदारांपैकी ७७६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला येथे ९३.४९ टक्के मतदान झाले. नायगव्हाण येथील ९१२ मतदारांपैकी ८६० मतदारांनी हक्क बजावल्याने येथे सर्वाधिक ९४.३० टक्केवारी राहिली. मंगळवारी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.़

बातम्या आणखी आहेत...