आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पन्न:मनमाड रेल्वेस्थानकाची 95 लाखांची कमाई

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकातून दिवाळी उत्सवकाळात ३५ टक्के तिकिट विक्रीत वाढ झाली. ९४ लाख ९७ हजार रुपयांची कमाई झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.यंदाच्या दिवाळीत २१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान मनमाड रेल्वे तिकीट घरातून ४३,४६३ तिकिटांची विक्री झाली असून ६१ हजार प्रवाशांनी प्रवास केला. या तिकीट विक्रीतून ७६ लाख ७ हजार ४६५ रुपये अनारक्षित उत्पन्न मिळाले. तर आरक्षित तिकीट काढून १८८० विक्री झाली असून ३७३५ प्रवाशांनी प्रवास केला. यामधून १८ लाख ९० हजार उत्पन्न मिळाले.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, भुसावळ, खंडवा आणि बडनेरा रेल्वेस्थानकातून ११ लाख ६६ हजार २९५ प्रवाशांनी प्रवास केला असून २१ कोटी ९२ लाख ९१ हजार १२ रुपये २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान अनारक्षित आणि आरक्षित तिकीट विक्रीद्वारे उत्पन्न मिळाले आहे. मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकातून देशाच्या विविध भागात ये-जा करण्याकरिता प्रवासी रेल्वेगाडी उपलब्ध होत असल्याने नेहमीच या स्थानकात प्रवाशांची वर्दळ असते. या स्थानकातून १२५ हून अधिक प्रवासी रेल्वेगाड्या रोज ये-जा करतात.

बातम्या आणखी आहेत...