आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरवासीय चार वर्षांपासून मेट्राे निआे आणि नाशिक-पुणे सेमी हायस्पिड रेल्वेची प्रतिक्षा करत आहेत. गुरुवारी (दि. ९) राज्याच्या अर्थसंकल्पात याकरिता केवळ निधी देणार पण किती हे सांगण्यात आले नाही. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने बाह्य रिंगराेडसारख्या कामांसाठी कुठलीही घाेषणा नाही, आयटी पार्कसारख्या भाजपच्याच प्रकल्पाचा साधा उल्लेखही नसल्याने नाशिककरांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे सर्क्युलर इकाॅनाॅमी पार्कची उभारणी तसेच ‘सारथी’ संस्थेच्या विभागीय संकुलासाठी ५० काेटी, नांदूरनाका येथे उड्डाणपुलासाठी ५० काेटी आणि पेठराेडवर आदिवासी संकुलासाठी ९९ काेटी रुपये आणि ज्याेतिर्लिंग त्र्यंबकेश्वरच्या विकासाच्या घाेषणा दिलासा देणाऱ्या आहेत.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग, नाशिक निओ मेट्रो प्रकल्प यासाठी निधी देण्यात येईल पण किती निधी उपलब्ध करून देण्यात येईल याची स्पष्टता नाही. इतर शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणले जात असतांना वेगाने विकसित हाेत असलेल्या नाशिकमध्ये मात्र टायरबेस मेट्राे निआे चालणार ही घाेषणा हाेऊन चारवर्ष हाेत आले तरी हा प्रस्ताव अद्यापही केंद्र सरकारच्या मान्यतेसाठीच पडून असल्याचे अर्थसंकल्पातून समाेर आले आहे. विशेष म्हणजे, दिल्ली-मुंबइ इंडस्ट्रियल पार्कमध्ये समाविष्ट हाेण्यासाठी पाण्याची गरज दमणगंगा-पिंजाळ नार-पार इत्यादी नदीजोड प्रकल्पातून सुटणार आहे. हा प्रकल्प राज्य निधीतून करू अशी घोषणा केली मात्र कुठल्याची निधीची तरतूद केली गेलेली नाही. शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल उभारणीकरिता ५४७ काेटी रुपयांची तरतूद असून याचा फायदा नाशिककरांना कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने हाेणार आहे.
किकवी धरणासाठी ३६ कोटी
भविष्यात नाशिकवासियांना पाणीटंचाईची झळ पोहाेचू नये यासाठी प्रस्तावित किकवी धरणाच्या उभारण्यासाठी यापूर्वी वनविभागाकडून हस्तांतरित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी शासनाने ३६ कोटी रुपयांच्या निधीला अर्थसंकल्पात मंजूरी दिली आहे. यामुळे आता वनविभागाच्या मोबदल्याची अडचण दूर झाली असून लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून प्रत्यक्ष धरण उभारणीच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध होणार आहे. अर्थसंकल्पात किकवी धरणापोटी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला वन विभागाला देण्यासाठी ३६ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.