आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजतगाजत निरोप:गणरायाला निराेप 75  फूट लांबीचा राष्ट्रध्वजाचे आकर्षण

मनमाड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमधील गोदावरीच्या राजाला गुरुवारी वाजतगाजत निरोप देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त व कार्यकर्ते उपस्थित होते.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गोदावरीचा राजा विसर्जन मिरवणुकीत ७५ फूट लांबीच्या राष्ट्रध्वजाने नागरिकांचे लक्ष वेधले. गोदावरीचा राजा मंडळाचे यंदा २६ वे वर्ष आहे. मनमाड कुर्ला-गोदावरी एक्स्प्रेस कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून बंद आहे. पण त्याच धर्तीवर मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समर स्पेशल एक्स्प्रेस ही गाडी सुरू करण्यात आलेली आहे.

मनमाड रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारापासून या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. आकर्षक चित्ररथामध्ये श्रींची मूर्ती, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ फूट लांबीचा राष्ट्रध्वज सैनिकी वेश धारण केलेले शालेय विद्यार्थी आणि भारतमातेचा सजीव देखावा, ढोल-ताशा पथक, वाद्यवृंद व गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करणारे हजारोंवर चाकरमाने, प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते गणेशभक्त व नागरिक विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती करून या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना गटनेते गणेश धात्रक, रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक एस. एस. भिंगे व लोहमार्ग पोलिस निरीक्षक शरद जोगदंड सहभागी झाले होते. मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर श्रींचे विसर्जन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...