आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपपत्र दाखल:टेरर फंडिंगप्रकरणी मालेगावच्या दाेघांंविराेधात आराेपपत्र दाखल

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेरर फंडिंगप्रकरणी देशभर गाजलेल्या व संशयित ठरलेल्या पीएफआय या दहशतवादी संघटनेच्या एकूण सहा संशयितांविरोधात नाशिकच्या दहशवादविराेधी पथकाने गुरुवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. नाशिक न्यायालयाने एटीएसला या संशयितांविराेधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली हाेती. मात्र, एटीएसने मुदत संपण्यापूर्वीच ४ हजार पानांचे आरोपपत्र विशेष जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश पी. एफ. कुलकर्णी यांच्यासमोर सादर केले.

केंद्र सरकारने सप्टेंबर २०२२ मध्ये देशभरात छापे टाकून मिळालेल्या माहितीनुसार पीएफआयसह रिहॅब इंडिया फाउंडेशन, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम काैन्सिल, नाॅन कॅन्फेडरेशन ऑफ ह्युमन राइट‌्स, नॅशनल ह्युमन फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पायर इंडिया फाउंडेशन यांच्यावर बंदी घातली आहे. बंदीनंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी निगडीत सहा जणांना एटीएसने अटक केली हाेती. यात मालेगावचा मौलाना सहेफू रहेमान व इमाम कौन्सिलचा मौलाना इरफान दाैलत नदवीसह रझी अहमद खान (काेंढवा), कय्यूम शेख (पुणे), वसीम शेख (बीड) व माैला नदीम मुल्ला (काेल्हापूर) यांचा समावेश हाेता. एटीएसच्या कोठडीत असलेल्या या संशयितांना गेल्या महिन्यात न्यायालयीन कोठडी मिळाली हाेती. एटीएसने सखाेल तपास करत भक्कम पुरावे जमा करून आरोपपत्र दाखल केले आहे. एटीएसने दाखल केलेल्या पुराव्यांना शह देण्यासाठी आम्ही भक्कम पुरावे सादर करू, असे अॅड. माेहंमद अमीर खान यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...