आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुंधाटे-कळवण रस्त्यावर डांगसौंदाणे पोलिस दूरक्षेत्रासमाेर असलेल्या दुकानाला मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी आग लावल्याची तक्रार सटाणा पोलिसांत दुकानमालक योगिता गोपालदास बैरागी यांनी दाखल केली आहे.बुंधाटेचे माजी उपसरपंच नंदूदास बैरागीयांची मुलगी योगिता बैरागी यांची कळवणडांगसौंदाणे रस्त्यावर आदिवासी विकासमहामंडळाच्या सोसायटी गोडाऊन जवळकिराणा व कोल्ड्रिंक्स व्यवसायाची लोखंडीटपरी आहे.
याच ठिकाणी त्यांचा रसवंतीचाही व्यवसाय आहे. दुकानापासून बैरागी यांचेघर हे हाकेच्या अंतरावर असून रात्री टपरीच्यामागील बाजूने अज्ञात समाजकंटकाने यादुकानात आग लावल्याची तक्रार करण्यातआली आहे. मध्यरात्री सुमारास बुंधाटे येथीलशशिकांत जगताप हे कळवण रस्त्यानेबाहेरगावहून आले असता त्यांना दुकानातूनधूर बाहेर येताना दिसल्याने त्यांनी बैरागीकुटुंबाला उठवत घटनेची माहिती दिली. याआगीत या दुकानातील सुमारे अडीचलाखांचा किराणा, कोल्ड्रिंक्स व स्टेशनरीमालासहफ्रीज व दुकानाचे फर्निचर जळूनखाक झाले.याबाबत सटाणा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पाेलिसांनी घटनास्थळीभेट देत पंचनामा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.