आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात शिव जयंतीपूर्वी दोन महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सुशोभीकरणासह उभारला जाईल. संबंधित ठेकेदाराला त्यासाठी आगाऊ रक्कम देण्यात आली आहे. व हे काम वेळेत पूर्ण होईल, अशी माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिले, त्यानंतर मंगळवारी सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
दोन दिवसांपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तो पूर्णाकृती व्हावा व त्याचे सुशोभीकरण केले जावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे नाना शिंदे व विष्णू चव्हाण यांनी उपोषण सुरू केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मनमाडमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून अर्धाकृती पुतळा आहे. आजपर्यंत या पुतळ्याच्या सुशोभीकरणाविषयी नगरपालिकेने कुठेही लक्ष दिले नाही. १० ते १५ वर्षांपासून अनेक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी याबाबतची मागणी केली. पालिकेकडून त्यास प्रत्युत्तर म्हणून फक्त आश्वासनेच मिळाली प्रत्यक्षात कृती झालेली नाही. याबाबत पालिकेने कोणत्याही प्रकारचे टेंडर पास केलेले नाही. या सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात केलेली दिसत नाही.
पालिकेमार्फत याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने सकल मराठा समाजातर्फे हे उपोषण सुरू करण्यात आले होते. विविध राजकीय पक्ष, संघटनांतर्फे उपोषणाला पाठिंबा देण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.