आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठेकेदाराच्या अनागोंदी कारभारामुळे अवघ्या एक महिन्यापूर्वीच तयार केलेला रस्ता जागोजागी उखडला असून मोठे खड्डे पडल्याचा प्रकार येथून जवळच असलेल्या पांनझणदेव-धोटाणे बुद्रुक या जोडरस्त्याबाबत घडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी धोटाणे बुद्रुकचे उपसरपंच रावसाहेब कुनगर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
परिसरातील पांझनदेव-धोटाणे या गावापासून मनमाड-नांदगाव महामार्गाला जोडण्यात येणारा रस्ता अवघ्या एक महिन्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तयार झालेला आहे. पण, ठेकेदाराने काम करताना निकृष्ट केल्याने पहिल्याच पावसात हा रस्ता उखडला आहे. या रस्त्याचे दोन किलोमीटरचे काम संबंधित ठेकेदाराने नुकतेच केले आहे. मात्र, काम करताना फक्त बीबीएन केले असून त्यात जाड खडी वापरून फक्त रोलर फिरवले आहे. त्याच्यावर कार्पेट व सीलकोट असा डांबरीकरणाचा कुठलाही प्रकार केला नसल्यामुळे हा रस्ता जागोजागी उखडला, खडी उघडी पडली असून खड्डे पडले आहेत, असे धाेटाने येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष बापू सूर्यवंशी, शिवसेना शाखाप्रमुख जगदीश कोळेकर यासह परिसरातील ग्रामस्थांनी केेलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.