आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री मुंबई येथील शासकीय निवासस्थानाहून नाशिक मार्गे मालेगावमध्ये पोहचले. आज कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घराची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली.
एकनाथ शिंदे म्हणाले म्हणाले की, पोलिसांच्या घराच्या बाबतीत मी बैठक घेतली आहे. पोलिसांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे मला कळाले. जुन्या वसाहती असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. पोलिसांसाठी घराची निर्मिती करावी लागणार आहे. यासाठी आम्ही वरिष्ठ स्तरावरची बैठकही घेतली. रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला घराची चिंता असता कामा नये. घराची चिंता नसल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते.
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच 30 जुलै म्हणजेच आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. 30 जुलै आणि 31 जुलै रोजी मुख्यमंत्री मालेगाव तसेच संभाजीनगरचा दौरा करतील. दरम्यान या दौऱ्याला राजकीय पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. बंडखोर आमदार दादा भुसे आणि सुहास कांदे यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट मालेगावात पोहचले आहेत. तर एकनाथ शिंदे दौऱ्यात नाशिक जिल्ह्याचं विभाजन करुन स्वतंत्र मालेगाव जिल्ह्याची घोषणा करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.