आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:दोन गुंठ्यामध्ये साकारणार 500  झाडांचे मियावाकी जंगल

सिन्नर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घन वनाची उभारणी करण्याचे जपानी तंत्र मियावाकी जंगलाच्या तंत्रज्ञानावर आधारित येथील एसजी प्राथमिक शाळेत ५०० देशी जंगली झाडांची दोन गुंठ्यात लागवड करण्यात येणार आहे. माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संस्थेचे सचिव राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. मियावाकी जंगल निर्माण करणारी एसजी प्राथमिक शाळा जिल्ह्यातील पहिली ठरणार आहे.

माजी आमदार सूर्यभान गडाख यांचा स्मृतिदिन कार्यक्रमात उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी वृक्षप्रेमी म्हणून लौकिक असलेल्या माजी आमदार गडाख यांना त्यांच्या आवडत्या कामातून आदरांजली वाहण्यासाठी मियावाकी जंगल तंत्रज्ञानावर आधारित घन वनाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वनप्रस्थ फाउंडेशनचे पंकज देशमुख, वन विभागाच्या वनरक्षक वत्सला कांगणे, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष मनोज भंडारी, विकास गिते, मुख्याध्यापक उदय कुदळे, संस्थेचे व्यवस्थापक सोमनाथ थेटे, पांडुरंग लोहकरे, सागर भालेराव, बापू चतुर, भास्कर गुरुळे, जीजा ताडगे, जयश्री सोनजे, वृषाली जाधव, अमोल पवार, मंदा नागरे, सुधाकर कोकाटे, कविता शिंदे, पद्मा गडाख, गणेश सुके, नीलेश मुळे, योगेश चव्हाणके, सुवर्णा वारुंगसे, शिवाजी कांदळकर, संदीप गडाख, स्वाती कापसे आदी उपस्थित होते.

गडाखांच्या कार्याला उजाळा
पर्यावरणाचे जतन करून भावी पिढीला तसे संस्कार मूल्य देण्याचे आवाहन राजेश गडाख यांनी केले. माजी आमदार सूर्यभान गडाख यांना वृक्ष लागवड व संवर्धनाची आवड होती. त्याच्या कार्याला उजाळा देण्यासाठी मियावाकी उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले. पंकज देशमुख यांना मियावाकी फॉरेस्ट या विषयी माहिती सांगितली. उपशिक्षिका पद्मा गडाख यांनी गडाख यांच्या कार्याला उजाळा देताना औद्योगिक वसाहत, पाझर तलाव, पाणी योजना, मीटर हटाव आंदोलन आदी माहिती दिली.

या झाडांची होणार लागवड
हिवर, खैर, शमी, शिरीष, हिंगण बेट, चारोळी, पाचुंदा, सोनसावर, दुरंगी बाभूळ, कहांडळ, काळाकुडा, वावळ, मेडिशिंग, जंगली अंजान, पळस, गोंदण, काटेसावर, हटरून, पांगारा, धामणी, निमई, खिरणी, गुग्गुळ, सलई, शिवण, निम, बहावा, बारतोंडी, शिसव, भोरमाल, कुंकू आदी झाडांची लागवड होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...