आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:सिन्नरच्या नेहरू चौकातून‎ पिकअप पळवली‎

सिन्नर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नेहरू चौक परिसरातून ‎किराणा दुकानासमोर उभी केलेली ‎पिकअप अज्ञात चोरट्यांनी चोरून ‎नेल्याची घटना रविवारी (दि. ५)‎ रात्री घडली. १५ दिवसांत शहरातून ‎दुसऱ्या पिकअपची चोरी झाली‎ आहे.‎ याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली‎ माहिती अशी की, शहरातील नेहरू‎ चौक परिसरात सागर निवृत्ती मुत्रक‎ (४०) यांचे किराणा दुकान असून‎ माल वाहतुकीसाठी त्यांनी महिंद्र‎ पिकअप गाडी घेतलेली आहे.‎ शनिवारी (दि.४) रात्री १० वाजेच्या‎ सुमारास मुत्रक यांनी पिकअप‎ (एमएच १५, सीके ८०२१)‎ दुकानासमोर उभी करून ते घरी गेले‎ होते.

रविवारी सकाळी ९.३०‎ वाजेच्या सुमारास ते दुकान‎ उघडण्यासाठी आले असता‎ दुकानासमोर उभी केलेली पिकअप‎ आढळून आली नाही. त्यांनी सर्वत्र‎ शोध घेऊनही पिकअप सापडली‎ नाही. त्यामुळे मुत्रक यांनी सिन्नर‎ पोलिस ठाण्यात पिकअप चोरीला‎ गेल्याची फिर्याद दाखल केली.‎ त्यावरून पोलिसांनी अज्ञात‎ चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा‎ दाखल केला असून पुढील तपास‎ हवालदार पवार करत आहेत.‎

चोरटा सीसीटीव्हीत कैद :‎ दुकानातील सीसीटीव्हीत‎ शनिवारी रात्री १२.४० वाजता‎ पाठीवर सॅक असलेला एक तरुण‎ पिकअप जवळ आला. त्याने‎ पिकअपचे लाॅक उघडून ही‎ पिकअप चालू करून पलायन केले.‌‎ मात्र, चेहरा झाकलेला असल्याने‎ चोरट्याची ओळख पटवण्याचे‎ पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...