आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उधारीचे पैसे:उधारीचे पैसे मागितल्याने दुकानदाराचे पाडले दात

सिन्नर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेअरपार्टच्या उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दुकानदारास मारहाण करण्यासह हाताच्या बुक्कीने तोंडावर मारून दात पाडल्याची घटना येथील उद्योगनगर परिसरात घडली.

सिन्नरच्या उद्योगनगर भागात श्रीराम मुरलीधर ननावरे (४७) यांचे स्पेअरपार्ट विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातून जवळच असलेल्या जय बजरंग सर्व्हिस स्टेशनमधील गोविंद कृष्णा साळी यांनी ट्रकसाठी उधारीत स्पेअरपार्ट नेले होते. ननावरे त्यांच्याकडे स्पेअरपार्टच्या उधारीचे पैसे घेण्यासाठी गेले होते. ननावरे यांनी उधारी मागितल्यावर संशयित गोविंद साळी यांना राग येऊन त्यांनी ननावरे यांना डाव्या पायाच्या खुब्याजवळ मारून दुखापत केली. त्याचबरोबर हाताच्या बुक्कीने तोंडावर मारून दात पाडून गंभीर दुखापत केली. ननावरे यांनी दिलेल्या फिर्यादीहून संशयित गोविंद साळी यांच्याविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक हेमंत तांबडे अधिक तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...