आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समिती:मालेगावचे गटविकास अधिकारी देवरेंच्या खातेनिहाय चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंचायत समिती गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांच्यावरील आरोपांसह इतर तक्रारींच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात अली असून १५ दिवसांत या समितीने चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल यांनी दिले आहेत. रिपाइंचे ज्येष्ठ नेते देवराज गरुड यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मित्तल यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. मात्र, गरुड यांना अद्याप हे सूचित करण्यात आलेले नसल्याने त्यांचे बेमुदत उपोषण सुरूच आहे.

गरुड यांनी १ नोव्हेंबरपासून मालेगाव पंचायत समिती प्रवेशद्वारावर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी दि. २८ ऑक्टोबर रोजी चौकशी समिती नियुक्त केली आहे. मात्र, याची माहिती गरुड यांना न मिळाल्यामुळे त्यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. बागलाण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल.

समितीच्या सदस्यपदी बागलाणचे इ-व-द उपभियंता संदीप सोनवणे, सदस्य सचिवपदी चांदवड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. चौकशी समितीला कामकाज करण्यासाठी सर्व तक्रार अर्ज, दस्तऐवज व अभिलेख उपलब्ध करून देण्याच्या सूचना पंचायत समिती प्रशासनाला केल्या आहेत.

याची होणार चौकशी
तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकासासाठी शासनाकडून प्राप्त एक कोटी ९३ लाख रुपये निधीचा विनियोग, सन २०२०-२१ च्या यादीत ज्या गावांतील वस्तीची पूर्ण झालेली कामे पुन्हा नव्या यादीमध्ये समाविष्ट करून ५८ लाख रुपयांचा अपहार करण्याचा डाव असल्याचा आरोप, रावळगाव ग्रामपंचायत हद्दीत सरकारी जागेवर १७ लोकांनी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण या सर्व तक्रारी व आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...