आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा:सेनेचा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, मनमाड-लासलगाव-चांदवड चौफुली येथील प्रवेशद्वाराजवळ राेहित्र बसविणे हे प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन शिवसैनिकांनी कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना दिले.

गुरुव्दारासमोर राेहित्र असून रोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सध्या गणेशाेत्सव सुरू आहे. त्यात वीज खंडित हाेत असल्याने सर्वत्र अंधार हाेताे. हा प्रकार हा येथील राेहित्र हुडकोला जाेडल्याने भार वाढून वीजपुरवठा खंडित असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे या राेहित्रावरील भार कमी करण्यात येऊन येथील वीजपुरवठा सुरळीत ठेवावा व नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर सहसंपर्कप्रमुख अल्ताफ खान, प्रवीण नाईक, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारिया, शहरप्रमुख मयूर बोरसे, प्रवीण सूर्यवंशी, स्वराज्य देशमुख, प्रवीण धाकराव, योगेश देशपांडे, शैलेश सोनवने, लियाकत शेख, अनिल दराडे, विजय मिश्रा,माधव शेलार आदी पदाधिकारी व शिवसैनिकांनी स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...