आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत चांगल्या आरोग्यासाठी व शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्र मीलेट मिशनचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याचवेळी कृषी सहायकांनी प्रचार व प्रसिद्धीसाठी बनवलेल्या www.mahamillets.org या वेबसाइटचे लोकार्पण शिंदे यांच्या हस्ते झाले. मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमास कृषिमंत्री अब्दुल सत्तार, उद्योग मंत्री उदय सामंत, प्रधान सचिव एकनाथ डवले, आयुक्त सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
वेबसाइट तयार करणाऱ्या सहायक कृषी अधिकारी व तिफण फाउंडेशनचे संस्थापक सुखदेव जमदाडे (अहमदनगर), सहसंस्थापक प्रदीप भोर (नाशिक), संचालक संतोष पाटील (कोल्हापूर), संदीप केवटे (सातारा) यांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी गौरव केला. कृषी विस्तार संचालक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही वेबसाइट करण्यात आली आहे.
सर्वांनी पौष्टिक तृणधान्य सेवन करण्याचे व त्याची प्रचार प्रसिद्धी करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. महाराष्ट्र मीलेट मिशन कार्यक्रम करिता २५० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. उपक्रमास शासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी पिकविणाऱ्या उत्कृष्ट शेतकऱ्यांचा व प्रक्रिया धारक उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.