आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:भांडणाची कुरापत काढून तरुणाचा खून

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील भांडणाची कुरापत काढून दोघा अल्पवयीन तरुणांनी समीर अस्लम शहा सुलेमान शहा (१७) याचा चाकूने भोसकून खून केला. याप्रकरणी रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार (दि.२) रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मयताचे पालक अस्लम शहा सुलेमान शहा यांनी रमजानपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

शहा कुटुंबिय बुधवारी विवाहनिमित्त दरेगाव येथे गेले असताना त्यांचा मुलगा समीर हा घरी एकटा होता. त्याचवेळी मागील भांडणाची कुरापत काढून दोन अल्पवयीन तरुणांनी त्याला पकडून ठेवत त्याच्यावर चाकूने वार केला. यामुळे जखमी झालेल्या समीरला कुटंुबियांनी तत्काळ सामान्य रुग्णालय व त्यानंतर रब्बानी रुग्णालय, इकरा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रमजानपुरा पोलिसांनी खून करणाऱ्या दोघा अल्पवयीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...