आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

118 विधानसभा मतदारसंघा:चांदवड मतदारसंघात आधार सिडिंगला प्रारंभ

चांदवड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदवड ११८ विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा आधार क्रमांक हा मतदार यादीशी संलग्न करण्याच्या कामास सोमारपासून (दि. १) प्रारंभ झाला असून मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनी बीएलओंच्या माध्यमातून अथवा थेट तहसील कार्यालयात फॉर्म नंबर ६ ब भरून आपला आधार क्रमांक मतदार यादीशी संलग्न करावा, असे आवाहन तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी प्रदीप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाने मतदारयादीत नाव असलेल्या प्रत्येक मतदाराचा आधार क्रमांक हा मतदार यादीशी संलग्न करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार चांदवड मतदारसंघात ही मोहीम सोमवार (दि. १) सुरू करण्यात आली आहे. मतदार यादीशी आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी मतदारांनी त्यांचा आधार क्रमांक संबंधीत बीएलओंकडे देऊन फॉर्म नं. ६ ब भरून द्यावा. त्यासोबत आधारचा फोटो द्यायचा आहे. मतदार स्वत:ही आयोगाच्या एनव्हीएसपी पोर्टलवरूनही ही प्रक्रिया करू शकता.

बातम्या आणखी आहेत...