आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक सोहळा साजरा:त्रिंगलवाडी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस अभिषेक; दांडपट्टा, तलवारबाजीचे प्रात्यक्षिक

घोटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घोटी येथील कळसूबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी सालाबादप्रमाणे सोमवारी पहाटेच इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध शिवकालीन त्रिंगलवाडी किल्ल्यावर चढाई करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत असलेल्या राहुल हांडे या युवकाची किल्ल्यावर मिरवणूक काढून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा केला.

यावेळी युवकांनी मावळ्यांचा वेष परिधान केला होता. मुलींनी पारंपरिक तलवारबाजी, दांडपट्टा खेळून शिवराज्याभिषेक सोहळ्याची शोभा वाढवली. या प्रसंगी शिवमय वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी कळसूबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, अभिजित कुलकर्णी, बाळासाहेब आरोटे, अशोक हेमके, प्रवीण भटाटे, राहुल हांडे, महेंद्र आडोळे, गोकुळ चव्हाण, सुरेश चव्हाण, संतोष म्हसणे, सोमनाथ भगत, नीलेश बोराडे, साहेबराव आंबापुरे, रमेश हेमके, संजय मंत्री जाधव, पांडुरंग भोर, नितीन भागवत, आदेश भगत, उमेश दिवाकर, संकेत आडोळे, शिवा आडोळे, प्रथमेश नवले, कु. साक्षी आरोटे, साक्षी आडोळे तसेच इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...