आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट सरपंच निवडीमुळे चुरस:ग्रामपंचायतींसाठी साेमवारपासून अर्ज स्वीकृती

मालेगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घाेषित झाला आहे. नियाेजित कार्यक्रमानुसार साेमवार (दि. २८) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेत आहे. जनतेतून थेट सरपंच निवड जाणार असल्याने लढती अटीतटीच्या व चुरशीच्या हाेणार आहेत.ऑक्टाेबर व डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपणाऱ्या १३ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या २१ ऑक्टाेबरला प्रसिद्ध झाल्या हाेत्या. आता निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

१७ ऑगस्टला ग्रामपंचायतींच्या सदस्य पदाचे आरक्षण जाहीर झाले हाेते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात थेट सरपंचपदाचे आरक्षण निघाले हाेते. या आरक्षणानुसारच निवडणूक हाेत आहे. १३ पैकी सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. दाभाडीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग तर साैंदाणेचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव आहे. गावपातळीवर पॅनल निर्मिती झाली असून थेट सरपंचपदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे.

थेट सरपंचपदाचे आरक्षण
राेंझे - अनुसूचित जमाती, {टाेकडे - अनुसूचित जमाती, {करंजगव्हाण - अनुसूचित जमाती (महिला) {निंबायती - अनुसूचित जमाती (महिला) {दाभाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग {माेहपाडे - नागरिकांचा मागास प्रवर्ग {साैंदाणे - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) {पाटणे - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) जाटपाडे - सर्वसाधारण {वजीरखेडे - सर्वसाधारण महिला {चाैकटपाडे - सर्वसाधारण महिला, {शिरसाेंडी - सर्वसाधारण महिला {माल्हणगाव - सर्वसाधारण

बातम्या आणखी आहेत...