आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:पाडळीजवळ अपघात; मुकणे येथील युवक गंभीर जखमी

घोटी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-आग्रा महामार्गावर पाडळीजवळ दुचाकी स्लीप झाल्याने युवक जखमी झाला. दुचाकी (एमएच १५ सीडब्ल्यू १३८३) नाशिककडून मुंबईच्या दिशेने जात असताना सॅमसोनाईट गोदामाजवळ ती स्लीप झाली. यामध्ये विष्णू निवृत्ती बोराडे (३५, रा. मुकणे) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी जखमीला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर पाडळी फाट्याजवळ सोमवारी दुपारी नाशिककडून घोटीच्या दिशेने जाणारी भरधाव वॅगन आर (एमएच १५ बीएन ५८४२) उलटली. यात ३ जण गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिकेने तीन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. उमेश आर. भट्टड (४६), उल्हास एन. पारखी (५०), अनिल विठ्ठल लोखंडे (४५, सर्व रा. नाशिक) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...