आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:पेरलेल्या पिकाची अचूक नोंद; इ-पीक पाहणीला प्रतिसाद, 90 लाख शेतकऱ्यांची नोंदणी

मालेगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासनाच्या अभिलेख्यांमध्ये व्हावी आणि त्याचा शेतकऱ्यांनाही संकटकाळात नुकसानभरपाईसाठी लाभ व्हावा या हेतूने ‘इ-पीक पाहणी’ प्रकल्प राज्यात १५ ऑगस्ट २०२१ पासून राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात ३८० पिकांची तर रब्बी हंगामात २६३ पिकांची आणि उन्हाळी हंगामात १८३ अशा एकूण ८२६ पिकांची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षात सोयाबीन पिकाखाली २५ लाख ८८ हजार ४१३ हेक्टर क्षेत्र आह. ९ लाख ९१ हजार ९६४ हेक्टरवर हरभरा पीक घेण्यात आले. १ लाख ९१ हजार ३३८ हेक्टरवर भात पीक घेण्यात आले आहे.

महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या सहाय्याने इ-पीक पाहणी ॲपची निर्मिती केली आहे. इ-पीक पाहणी प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा आहे. जमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठीही याचा फायदा होणार आहे. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणेदेखील सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी केलेली पिकांची नोंदणी स्वयंप्रमाणित मानण्यात येते. केवळ १० टक्के तपासणी तलाठयांमार्फत करण्यात येते.

या मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील. तलाठी नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रिअल टाइम माहिती अॅप्लिकेशनमध्ये संकलित होईल.- वर्षा फडके-आंधळे, मुंबई (लेखिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ सहायक संचालिका आहेत.)

इ-पीक पाहणी ॲपचा असा करा वापर
}गुगल प्ले स्टोअरवरून इ-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करा, त्यासाठ https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek या लिंकवर क्लिक करा }आपला अचूक मोबाइल नंबर टाकून त्यावर येणारा ओटीपी भरुन नोंदणी पूर्ण करा.}परिचयमध्ये स्वत:चा फोटो अपलोड करून इतर माहिती साठवा.}शेतावर पीक पाहणी करताना इंटरनेट आवश्यक नसते. फक्त जीपीएस चालू असणे आवश्यक असते.}जेथे इंटरनेट नेटवर्क मिळेल तेथून पीक पाहणी ॲपमधील अपलोड पर्याय निवडून माहिती अपलोड करावी.}अधिक माहितीसाठी गावचे तलाठी किंवा कृषी सहायक यांच्याशी ०२०-२५७१२७१२ वर संपर्क करावा.

इ-पीकमध्ये मिश्र पिकातील घटक पिकांसाठी हंगाम, लागवड दिनांक निवडण्याची सुविधा शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदविल्यानंतर ४८ तासांच्या आत त्यात सुधारणा करण्याची सुविधा. गावामध्ये नोंदविलेल्या पीक पाहणीची माहिती गावातील सर्वांना व्ह्यू ओन्ली स्वरूपात उपलब्ध. तीन वर्षांची इ-पीक पाहणी माहिती नमुना न. १२ वर दिसणार. ५ वर्ष संग्रहित ठेवली जाणार. काही कायम पड प्रकारासाठी Geo tagged फोटो अनिवार्य जिओ फेन्सिंगची ॲपमध्ये सुविधा आहेत.

राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला महत्त्वाकांक्षी इ-पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानप्रमाणेच देशातील इतर राज्येही हा प्रकल्प स्वीकारत लवकरच हा प्रकल्प देशव्यापी स्तरावर राबविला जाईल, असा विश्वास वाटतो.- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

बातम्या आणखी आहेत...