आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्री थांबवण्याच्या सूचना:नायलॉन मांजाचा वापर व विक्री केल्यास कारवाई

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नायलॉन मांजाचा वापर व विक्री करू नये, अन्यथा कारवाई करून पोलिसांत गुन्हा दाखल जाईल, असा इशारा नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिला आहे.नायलॉन मांजामुळे पक्षी व नागरिकांना इजा पोहोचली जाते. प्रसंगी इजा प्राणघातक ठरतात. या घटना राेखण्यासाठीव पर्यावरणावर होणारा अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम ५ अन्वये पक्षी व मनुष्यास इजा करणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीस व वापरास प्रतिबंध घालण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

शहरातील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक थांबवावी. नायलॉन मांजा विक्री व साठवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी नगरपरिषदेने पथक नेमलेले असून नायलॉन मांजा विक्री व साठवणूक धारकांवर जप्तीची कारवाई करून शहर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे मुतकेकर यांनी म्हटले आहे.

नागरिकांनी देखील नायलॉन मांजाची खरेदी करू नये. आपल्या या कृतीमुळे मनुष्य, पक्षी, जनावरे यांना कोणतीही इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेऊन पर्यावरण संरक्षणासाठी नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...