आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई,:गुटखा विकणाऱ्या दाेघा‎ पानटपरी चालकांवर‎ कारवाई, गुटखा जप्त‎

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुटख्याची चाेरटी‎ विक्री करणाऱ्या पानटपरी‎ चालकांवर पाेलिसांनी कारवाई सुरू‎ केली आहे. आझादनगर भागात‎ शनिवारी दाेन ठिकाणी छापे टाकून‎ चार हजार रुपये किमतीचा गुटखा‎ जप्त करण्यात आला आहे.‎ राज्यात गुटखा विक्रीला पायबंद‎ घालण्यात अाला आहे.‎ मात्र,परराज्यातून छुप्या पध्दतीने‎ गुटखा आणून त्याची सर्रास चाेरटी‎ विक्री हाेत आहे. पाेलिसांनी‎ सातत्याने कारवाया करत गुटखा‎ विक्रीच्या बेकायदा धंद्याला आळा‎ घालण्याचा प्रयत्न केला आहे.‎

पानटपऱ्यांवर चढ्या दराने गुटखा‎ पुड्यांची विक्री हाेत असल्याची‎ माहिती मिळाल्याने आझादनगर‎ पाेलिसांनी अली अकबर हाॅस्पीटल‎ परिसरातील एका पानटपरीवर‎ कारवाई केली. आसिफ निसार‎ सय्यद याच्या ताब्यातून अडीच‎ हजारांचा गुटखा जप्त केला. दुसरी‎ कारवाई बाबर हाॅटेलजवळील‎ टपरीवर करत दीड हजाराच्या‎ गुटखा मुद्देमालासह अब्दुल्ला राैफ‎ खान याला ताब्यात घेतले.‎ याप्रकरणी आझादनगर पोलिसांत‎ दाेन स्वतंत्र गुन्हे दाखल आहे.‎

बातम्या आणखी आहेत...