आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मालेगावी रात्री 11.30  नंतर हॉटेल व दुकाने बंद न झाल्यास कारवाई

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात रात्री साडेअकरा वाजेनंत हॉटेल व इतर आस्थापना सुरू आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस उपाधीक्षक तेजबिरसिंह संधू यांनी दिला आहे. शासन नियमानुसार रात्री साडेअकरा वाजेनंतर कोणतेही व्यवसाय सुरू ठेवता येत नाहीत. ठिक-ठिकाणी मध्यरात्री देखील तरुण व नागरिकांचे घोळके आढळून येत आहेत. शहरातील व्यावसायिकांनी रात्री साडेअकरा नंतर आस्थापना बंद कराव्यात, नागरिकांनी एकत्र येऊ नये.

अन्यथा, कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपाधीक्षक उपाधीक्षक संधू यांनी म्हटले आहे. बेकायदा द्रव्य व शासनाने बंदी घातलेले पदार्थ विरोधात देखील छापासत्र सुरू करण्यात आल्याचे संधू यांनी सांगितले. कोणत्याही दुकानांवर बेकायदा गुटका अथवा शासनाने बंदी घातलेले पदार्थविक्री होत असल्यास या ठिकाणाची माहिती द्यावी, आपण स्वतः कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...