आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

सिन्नर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यांना सन्मानित केले जाणार आहे. सिन्नर येथील सिल्व्हर लोटस स्कूलचे संगीत शिक्षक भरत गोरख मांडे, जनता विद्यालय डुबेरेच्या शिक्षिका आर. डी. खंडीझोड, वाजे विद्यालयाचे शिक्षक ज्ञानदेव विठ्ठल नवले, न्यू इंग्लिश स्कूल पंचाळे येथील विलास बाळकृष्ण पवार, आगासखिंड येथील शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूलचे हेमंत बाळासाहेब टिळे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

लवकरच हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरचे अध्यक्ष अनिल गोर्डे, सेक्रेटरी सुरेश जोंधळे, माजी अध्यक्ष किरण भंडारी, संस्थापक अध्यक्ष सतीश नेहे, नीलेश काकड, प्रसाद पाटोळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...