आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबागलाण मधील मुदत संपलेल्या ४० ग्रामपंचायतींवर प्रशासक राज आल्याने आता ग्रामपंचायतींच्या सत्तेच्या चाव्या निवडणूक होईपर्यंत तालुक्यातील विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकारीकडे असणार आहेत. एकाच वेळेस ४० ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून बागलाण पंचायत समितीमधील विस्तार अधिकारींची नेमणूक एकच वेळी एकापेक्ष्या अधिक ग्रामपंचायतींवर झाल्याने या प्रशासक राज काळात ग्राम विकासाला खीळ बसतो की सुरळीत कारभार चालतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असे असले तरी गावपातळीवर स्थानिक पुढाऱ्यांनी निवडणूक पूर्व तैयारीसाठी वेग धरला आहे.
प्रमुख व मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीची ही संख्या माेठी असल्याने अनेक गावात स्थानिक राजकारणाला अनन्य साधारण महत्त्व आले आहे. अनेक इच्छुकांनी आपल्या इच्छा मतदारांना बोलून दाखवत निवडणुकीत उभे राहण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत तर अनेक ठिकाणी पॅनल निर्मिती व उमेदवार शोधशोध सुरू झाली आहे. इच्छुकांनी वैयक्तिक भेटीगाठी, सोशल मीडियाचा वापर करून अप्रत्यक्षय रित्या प्रचारला सुरवात केली आहे.
सध्यातरी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला नसल्याने थोडे दिवस ग्रामपंचायतीवर प्रशासक राज पाहावयास मिळणार आहे. आगामी निवडणुकीत किती ग्रामपंचायतीवर सत्ताधारी गट आपले अस्तित्व टिकविण्याचा यशस्वी होतात की परिवर्तनाची नांदी येते ते आगामी काळात समजणार असले तरी निवडणूक होईपर्यंत ग्रामीण भागातील पारावर आता गावपातळीच्या राजकारणाच्या चर्चेला उधाण येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.