आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेसर व बदापूर या गावांच्या शेतातील विहिरीमध्ये केमिकल युक्त द्रव्यांचा पाझर होऊन शेतीचे नुकसान होत असल्याने दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी कृष्णा एन्झोटेक कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर बाहेर बेमुदत उपाेषण सुरू केले हाेते. मात्र, तहसीलदार प्रमाेद हिले यांनी आंदाेलनकर्त्यांची भेट घेऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी करण्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ, शेतकरी प्रतिनिधी आणि कंपनीच्या प्रमुख संचालक मीनल वर्मा यांच्यासाेबत बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी सुरू केलेले उपाेषण तिसऱ्या दिवशी मागे घेतले आहे.
याप्रसंगी सहायक पाेलिस निरीक्षक नितीन खडांगळे, पोलिस हवालदार चंद्रकांत निर्मळ उपस्थित होते नांदेसर व बदापूर शिवारातील शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी कंपनीच्या केमिकल द्रव्यामुळे पिण्यायोग्य राहिले नसल्याचा गंभीर आरोप करत दोन्ही गावच्या शेतकऱ्यांनी सदर कंपनी कायमस्वरूपी बंद करण्याचा मागणीसाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला हाेता. मात्र, त्यास प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात असल्याने भाऊसाहेब शिंदे, मगन शिंदे, संकेत शिंदे, मनोज शिंदे, ज्ञानेश्वर ढोमसे, धनंजय शिंदे, प्रकाश देवडे, शरद गायकवाड, श्रावण बेंडके आदींसह १५ ते २० शेतकरी उपोषणाला बसले होते.
कंपनीत घातक केमिकल्स वापरली जात आहेत. गाव व परिसरातील शेती तसेच ग्रामस्थांची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने त्वचारोग, खोकला आणि इतरही आजार पसरत असल्याने ग्रामस्थांना त्रास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अनेकदा विनंती करूनही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आराेप आंदाेलकांनी केला आहे. निवेदनावर आंदाेलकांच्या सह्या आहेत. निवेदनासोबत ग्रामपंचायतीने दिलेले दाखले, प्रदूषित जमिनीमधील जळालेली पिकांचे फोटो, ग्रामस्थ आजारी पडल्याचा प्राथमिक आरोग्य केंद्राचा अहवाल, इतर कागदपतत्रही पुरावे म्हणून जोडलेली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.