आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भराव:इशाऱ्यानंतर कच्च्या पुलावर टाकला भराव

नांदगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाकंबरी नदीवर पूल नसल्याने नांदगावकर कृती समितीने प्रतीकात्मक तिरडी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

पूल आणि रस्त्याच्या प्रश्नावर नागरिक आक्रमक झाल्याने प्रशासनाने कच्च्या पुलाच्या वाहून गेलेल्या जागेवर पुन्हा भराव टाकून रस्ता तात्पुरत्या स्वरुपात रहदारी योग्य केला. शाकंबरी नदीला पाणी असल्यावर नदीच्या पलीकडे असणाऱ्या वडाळकर, पठाडे आणि आदिवासी वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती तसेच या भागात शहराची मुख्य स्मशानभूमी असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना नदीच्या पाण्यातून वाट काढावी लागत असे.

त्यामुळे नांदगावकर कृती समितीने प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत प्रशासनाने या ठिकाणी मातीचा भराव टाकून रस्ता रहदारी योग्य केला असला तरी नांदगावकर कृती समितीचे समाधान झालेले नाही. येथे पक्का पूल आणि चांगल्या रस्त्याच्या मागणीसाठी आपण ठाम असल्याचे सांगत २४ नोव्हेंबर रोजी प्रतीकात्मक तिरडी यात्रा काढण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे नांदगावकर कृती समितीने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...